WEST- CENTRAL RAILWAY RECRUITMENT 2023.

WEST- CENTRAL RAILWAY RECRUITMENT 2023.

WEST- CENTRAL RAILWAY RECRUITMENT 2023.
पश्चिम – मध्य रेल्वे विभागात महाभरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

भारतीय रेल्वेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी. भारतीय रेल्वेच्या पश्चिम – मध्य विभागात विविध ट्रेडच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या संबंधीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. या आस्थापनातील एकूण ३६२४ पदे भरली जाणार आहेत. सदरील पदासाठी पात्र उमेदवार विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्या अगोदर शैक्षणीक पात्रता,वयोमर्यादा, पदाचे विवरण, परीक्षा पद्धती, निवड पद्धती, जाहिरात, महत्वाचे तारीख, अधिकृत संकेतस्थळ या विषयी जाणून घ्या.

पदाचे नाव: अप्रेन्टिस
इतर उपपदे:
फिटर (फिटर ट्रेड), वेल्डर (वेल्डर ट्रेड ), टर्नर (टर्नर ट्रेड ), मशिनिस्ट (मशिनिस्ट ट्रेड), कार्पेन्टर (कार्पेन्टर ट्रेड ), पेंटर ( पेंटर ट्रेड ), मेकॅनिक DSL ( मेकॅनिक ट्रेड DSL ), मेकॅनिक मोटर ( मेकॅनिक मोटर ट्रेड ), प्रोग्रामिंग आणि प्रणाली प्रशासन सहाय्यक( संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक), इलेक्ट्रिशियन (इलेक्ट्रिशियन ट्रेड),इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक( इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड ), वायरमन (वायरमन, इलेक्ट्रिशियन ट्रेड ), मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी ( मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी ट्रेड), पाईप फिटर ( प्लबर,पाईप फिटर ट्रेड ), प्लबर (प्लबर ट्रेंड), ड्राफ्ट्समन (ड्राफ्ट्समन सिव्हिल) व स्टेनोग्राफर (स्टेनोग्राफी इंग्रजी). इत्यादी पदे भरण्यात येतील.

एकूण पदे: ३६२४
शैक्षणीक पात्रता
१)सदरील पदासाठी शैक्षणीक पात्रता १०वी व १२ वी या वर्गात किमान ५०% पेक्षा अधिक गूण असावेत.
२) तांत्रिक पात्रतेत तो संबंधीत पदाप्रमाणे आय.टी.आय उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा:
१) अर्जदारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 26/07/2023 रोजीचे त्यांचे वय 24 वर्षे पूर्ण केलेली नसावेत.
२) SC/ST साठी उच्च वयोमर्यादेत 05 वर्षांनी सूट आणि OBCसाठी 03 वर्षे सूट.
३) अपंग व्यक्ती (PWD):- उच्च वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल आहे.
४) माजी सैनिकासाठी उच्च वयोमर्यादेत 10 वर्षांपर्यंत शिथिलता आहे.

 

निवड पद्धती:
१) अप्रेन्टिस कायदा, 1961 अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी पात्र अर्जदारांची निवड केली जाईल.
२) गुणांच्या टक्केवारीची सरासरी घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
३) मॅट्रिक्युलेशन आणि आयटीआय या दोन्हीमध्ये मिळवलेले ५०% गूण गृहीत धरले जातील.
४) दोन अर्जदारांच्या बाबतीत समान गुण असल्‍यास अधिक वय असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.
५) जन्मतारीख सारख्याच असल्यास, प्रथम मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेलया अर्जदारास प्राधान्य दिले जाईल.
६) कोणतीही लेखी परीक्षा किंवा तोंडी होणार नाही.

वैद्यकीय तंदुरुस्ती आणि शारीरिक मानके:
१)बोलावलेल्या निवडक उमेदवारांना विहित वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करावी लागतील.
२) वैद्यकीय प्रमाणपत्रावर सरकारी दवाखान्यातील सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी असावी.

परीक्षा शुल्क:
१) खुला प्रवर्गासाठी १००रु. परीक्षा शुल्क असेल.
२) SC/ST/PWD/ व महिलांसाठी शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा: अर्जाची सुरुवात २७/०६/२०२३- अर्जाची शेवटची तारीख: २६/०७/२०२३.
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
जाहिरात: येथे पहा.
अधिकृत संकेतस्थळ: https://wcr.indianrailways.gov.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *