Sashastra Seema Bal Recruitment 2023.

Sashastra Seema Bal Recruitment 2023.

Sashastra Seema Bal Recruitment 2023.
सशस्र सीमा बल भरती 2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

सशस्र सीमा बलाची तयारी करणाऱ्या युवकांसाठी विशेष भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सशस्र सीमा बल हे नेपाळ आणि भूतानच्या सीमेवर तैनात केलेले भारताचे सीमा रक्षक दल आहे. हे गृह मंत्रालयाच्या (MHA) प्रशासकीय नियंत्रणाखालील सात केंद्रीय सशस्र-पोलीस दलांपैकी एक आहे. शत्रूच्या कारवायांविरुद्ध/आक्रमणाविरुद्ध भारताचे सीमावर्ती भाग बळकट करण्यासाठी चीन-भारत युद्धानंतर 1963 मध्ये विशेष सेवा ब्युरो या नावाने या दलाची स्थापना करण्यात आली होती. सशस्र सीमा बलाच्या पदासाठी अधिसूचना लागू करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता.अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक / कम्युनिकेशन / इलेक्ट्रिशियन / कारभारी / पशुवैद्यकीय).
एकूण पदे: ९१४.

प्रवर्ग निहाय पद संख्या: खुला – ४३२, इडब्लूस- ७७, ओबीसी – १७६, अजा – १४७, अज – ८२.
पात्रता: १०वी सह आयटीआय उत्तीर्ण/ पशुवैद्यकीयमध्ये डिप्लोमा/ पशुधन विकास / भौतिकशास्त्र, रसायनशास्र आणि गणितासह 12वी उत्तीर्ण / इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / संगणक विज्ञान / आयटीमध्ये डिप्लोमा.

वयोमर्यादा: ७/६/२०२३ पर्यंत १८ ते २५ च्या आतील वयोगट असावे. अजा / अज गटासाठी ०५ वर्षे सूट ओबीसी साठी ०३ वर्षे सूट असेल.
वेतन: २५,५०० ते ८१,१०० दर महिना.

निवड प्रक्रिया: लेखी व तोंडी.
परीक्षा शुल्क: खुला व ओबीसीं व EWS- साठी १००/- अजा, अज साठी फीस नाही.

शेवटची तारीख: ७/६/२०२३.
जाहिरात पाहण्यासाठी :https://ssb.gov.in/index1.aspx?lsid=14831&lev=2&lid=14716&langid=1&Cid=0

अधिकृत माहितीसाठी:https://ssb.gov.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *