Population Growth and Our Needs 2023.

Population Growth and Our Needs 2023.

Population Growth and Our Needs 2023.
लोकसंख्या वाढ व आपल्या गरजा २०२३.

नमस्कार मित्रांनो govjob24.com या साईटवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे.

आपण दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतो. या दिवसाचे निमित्त साधून अनेक लोकसंख्या विषयक अभ्यास करणाऱ्या संस्था विविध रिपोर्ट सादर करतात. आजमितीस जगाची लोकसंख्या ८,०४,९६,६८,०९५ इतकी आहे. त्यापैकी आपल्या भारताची लोकसंख्या १,४२,१८,६८,८४९ इतकी आहे. आपण सध्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून गणले जातो.जागतिक लोकसंख्येतील भारताचा वाटा १७.६६ % इतका आहे. भारताला एकूण जगाच्या क्षेत्रफळापैकी २.४ % इतकाच भूभाग लाभला आहे. त्यामुळे भारत एकीकडे लोकसंख्या संपन्न तर दुसरीकडे नैसर्गिक संसाधनात विपन्न देश बनत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधनावर खूप अधिक दबाव आहे. नॅशनल फूटप्रिंट अकाउंटनुसार २०२३ पर्यंत लोकसंख्येचा निसर्गावर इतका ताण असेल की, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला एक नव्हे तर अडीच भारताची गरज भासणार आहे.

इकॉलॉजिकल फूटप्रिंट :
पर्यावरणातील वनसंपदा, शेती, खाणकाम, मासेमारी, जलसंपदा,ऊर्जा साधने, माती, हवा व प्राणी संसाधने इत्यादी बाबीवर मानवाचा किती परिणाम होतो हे मोजण्यासाठी जे मापक वापरले जाते त्याला इकॉलॉजिकल फूटप्रिंट असे म्हणतात. यात नैसर्गिक संसाधनाचे किती शोषण होत आहे हे मोजले जाते. जागतिक लोकसंख्येच्या सर्वेक्षणानुसार (२०१७) मध्ये भारताचे इकॉलॉजिकल फूटप्रिंट प्रति व्यक्ती १. १९ हेक्टर आहे.

बायोकॅपेसिटी :
मानवाची गरज पूर्ण करण्याची निसर्गाची क्षमता म्हणजे बायोकॅपेसिटी होय.जागतिक लोकसंख्येच्या सर्वेक्षणानुसार (२०१७) मध्ये बायोकॅपेसिटी प्रति व्यक्ती ०.४३ हेक्टर  इतकी कमी आहे. याचा सरळ अर्थ होतो की निसर्गाकडून जे मिळत आहे. त्यापेक्षा मागणी जात आहे. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टीसाठी संघर्ष करणे अपरिहार्य बनले आहे.काही प्रसंगी कायदा व सुव्यवस्था ही डळमळीत होताना दिसत आहे.भारताकडे जगाच्या तुलनेत फक्त २% जंगल व ४% स्वच्छ पिण्यायोग्य पाणी आहे.

नद्यांवर लोकसंख्येचे भार :
वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची गरज ही वाढत जाणार आहे. नद्या या देशाच्या जीवनवाहिन्या आहे. घरगुती कामासाठी, उद्योगांसाठी, शेतीसाठी, वीजनिर्मितीसाठी व बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. एकंदरीत नद्या या देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावत असतात.

भारतातील  १२ प्रमुख नद्यांवर लोकसंख्येचे भार:  

नदी पात्र 2002 मध्ये  लोकसंख्येचे अवलंबित्व 2050 मध्ये लोकसंख्येचे अवलंबित्व
गंगा 37 कोटी 69.8 कोटी
साबरमती   60 लाख 02 कोटी
माही   67लाख 02 कोटी
नर्मदा   1.79 कोटी 2.9 कोटी
तापी   1.79 कोटी 2.9 कोटी
कृष्णा   6.9 कोटी 11.8 कोटी
लुनी 4.3 कोटी
गोदावरी 7.6 कोटी 10.5 कोटी
कावेरी  3.26 कोटी 5.7 कोटी
वैतरणा  1.67 कोटी 1.9 कोटी
महानदी  2.72 कोटी 5.2 कोटी
पेन्नार 1.43 कोटी 1.9 कोटी

लोकसंख्येची घनता:
२०२३ मध्ये जगाची सरासरी घनता ६० व्यक्ती प्रति. चौ. किमी आहे.तर भारताची सरासरी घनता ४३४.६० व्यक्ती प्रति. चौ. किमी आहे. हे प्रमाण ७ पटीने अधिक आहे. भारतातील उत्तर प्रदेश राज्याची घनता ८२९ व्यक्ती प्रति. चौ. किमी आहे. या राज्याची एकूण लोकसंख्या २४ कोटीहून अधिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये नैसर्गिक संसाधनाच्या अभावामुळे बाह्य स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे.

हवा प्रदूषणाचे प्रश्न:
प्रदूषण मुक्त स्वच्छ पर्यावरण लोकसंख्येची मूलभूत गरज आहे. या बाबतीत भारताची स्थिती खुप बिकट आहे. जगातील २० सर्वाधिक हवा प्रदूषित शहरांपैकी १४ शहरे भारतातील आहेत. यासोबतच भारत जगातील ८व्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे. सौदी अरब मधील दमाम  हे जगातील शहर सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. भारतातील नवी दिल्ली, सोलापूर, दरभंगा, मुज्जफरनगर व पटना ही शहरे अधिक प्रदूषित सहारे आहेत. चाड, इराक, पाकिस्तान, बहरीन व बांग्लादेश ही अनुक्रमे सर्वाधिक हवा प्रदूषित शहरे आहेत.

 

संदर्भ:

1https://designstudio.worldbank.org/2023/87025_Knowledge-Highlights/index.html

2. सर्वाधिक प्रदूषित शहरे

3.सर्वाधिक प्रदूषित शहरे व देश 

 

admin

2 thoughts on “Population Growth and Our Needs 2023.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *