NLC India Limited Recruitment 2023.

NLC India Limited Recruitment 2023.

NLC India Limited Recruitment 2023.
एन एल सी भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

एन एल सी मध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा. या संदर्भात एन एल सी ने अधिसूचना लागू केलेले आहे. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील नेवेली येथे आणि राजस्थान राज्यातील बिकानेर जिल्यातील बारसिंगसर येथे ओपनकास्ट खाणींमधून दरवर्षी सुमारे ३० दशलक्ष टन लिग्नाइटचे उत्पादन होते. वीज निर्मितीसाठी ३६४० मेगावॅट स्थापित क्षमतेच्या पिटहेड थर्मल पॉवर स्टेशनवर लिग्नाइटचा वापर केला जातो.

१९३४ मध्ये राव बहादूर एम.जांबुलिंगम मुदलियार यांच्या स्वत:च्या ६२० एकर शेतातील आर्टिसियन विहिरीत लिग्नाइटचा साठा सापडला.त्यांनी तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांशी संपर्क साधला,अधिकाऱ्यांनी नेवेली येथे भूवैज्ञानिकांना पाठवले.जमिनीच्या उत्खननासाठी त्यांनी उदारपणे आपली ६२० एकर जमीन तेंव्हाच्या मद्रास सरकारला दान केले.औद्योगिक प्रशिक्षणार्थी (ऑपरेशन्स व खाण सहाय्यक) या पदाच्या ५०० जागा त्वरित भरण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या.

विभाग: कोळसा मंत्रालय
उपविभाग:एन एल सी.
पदाची संख्या: ५००

पदाची नावे:
०१)औद्योगिक प्रशिक्षणार्थी – (विशेष खाण उपकरणे – ऑपरेशन्स)-२३८.
शैक्षणिक पात्रता: किमान 3 वर्षांचा अभियांत्रिकी पदविकापूर्ण असणे आवश्यक आहे.
०२) औद्योगिक प्रशिक्षणार्थी – (खाणी व खाणी सहाय्यक सेवा) २६२.
शैक्षणिक पात्रता: ITI मध्ये फिटर किंवा टर्नर किंवा इलेक्ट्रीशियन किंवा वेल्डिंग किंवा MMV किंवा डिझेल मेकॅनिक किंवा ट्रॅक्टर मेकॅनिक किंवा सिव्हिल या पैकी ट्रेंड उत्तीर्ण असावा.

 

 

वयोमर्यादा: ०१/०६/२०२३ रोजी अधिसूचना लागू झाल्यापासून. १८ ते ३७वर्षे खुला प्रवर्ग.अजा/अज-साठी ४२वर्षापर्यंत सूट व ओबीसीसाठी ४० वर्षापर्यंत सूट असेल.
परीक्षा शुल्क:शुल्क नाही.

वेतन: ०१)औद्योगिक प्रशिक्षणार्थी [विशेष खाणकाम उपकरणे (एसएमई) ऑपरेशन्स) या पदासाठी प्रशिक्षण कालावधी दरम्यान मिळणारे वेतन- पहिल्या वर्षी १८०००हजार रु. दुसऱ्या वर्षी २००००रु. व तिसऱ्या वर्षी २२००० हजार रु. इतके असेल.
०२) औद्योगिक प्रशिक्षणार्थी -(खाणी व खाणी सहाय्यक सेवा)- या पदासाठी प्रशिक्षण कालावधी दरम्यान मिळणारे वेतन- पहिल्या वर्षी १४००० हजार रु. दुसऱ्या वर्षी १६०००रु.व तिसऱ्या वर्षी १८००० हजार रु.इतके असेल.

निवड प्रक्रिया:
०१) निवड लेखी चाचणीद्वारे केली जाईल.
०२) अंतिम निवड ही उमेदवारांची निवड करताना मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या क्रमाने केली जाईल.
SC/ST/OBC-NCL/EWS प्रवर्गांसाठी आरक्षण लागू असेल.
महत्वाचे तारीख:०१/०६/२०२३ ते ०८/०७/२०२३.या दरम्यान अर्ज करू शकता.

जाहिरात: येथे पहा.

अधिकृत संकेतस्थळ:https://www.nlcindia.in/new_website/index.htm

 

admin

One thought on “NLC India Limited Recruitment 2023.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *