India Post office mega bharti 2023.

India Post office mega bharti 2023.

India Post office mega bharti २०२३.

भारतीय डाक विभागात बंपर भरती2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

आपण बऱ्याच दिवसापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यातल्या त्यात किमान 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची एक उत्तम संधी चालून आलेली आहे. भारतीय पोस्ट विभाग ही भारतातील खुप जुनी सरकारी संस्था आहे. त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.

भारतीय पोस्ट ही भारतातील सरकारी-संचालित टपाल प्रणाली आहे, जी दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पोस्ट विभागाचा भाग आहे. सामान्यत: पोस्ट ऑफिस म्हणून ओळखले जाते. ही जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात वितरित टपाल प्रणाली आहे. वॉरन हेस्टिंग्सने 1766मध्ये देशात पोस्टल सेवा सुरू करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत पुढाकार घेतला होता. सुरुवातीला “कंपनी मेल” या नावाने त्याची स्थापना करण्यात आली होती. नंतर 1854 मध्ये लॉर्ड डलहौसीने ते क्राउन अंतर्गत सेवेत बदलले. डलहौसीने एकसमान टपाल दर (सार्वत्रिक सेवा) सुरू केले आणि इंडिया पोस्ट ऑफिस कायदा 1854 पास करण्यास मदत केली. ज्यात 1837 साली पोस्ट ऑफिस कायद्यात लक्षणीय सुधारणा झाली.

भारतीय पोस्ट विभागात विविध पदांच्या 12828 पदासाठी मेगाभरती सुरु होत आहे.आपण अर्ज करण्यासाठी indiapostgdsonline.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

1.एकूण पदे :12,828

2.रिक्त पदाचे नाव :
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

3.शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.(MSCIT)

4.वयोमर्यादा : 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

5.परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी/EWS:₹100/- (SC/ST/PWD/महिला:फी नाही.)

6.निवड प्रक्रिया:
या पदांसाठी निवडीसाठी, उमेदवारांची निवड 10वी वर्ग माध्यमिक शाळा परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांच्या आधारे केली जाईल.

7.नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

8.अर्ज करण्याची पद्धत : online.

9.महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 जून 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :12 ते 14 जून 2023.

10.महत्वाच्या लिंक्स :

भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट https://indiapostgdsonline.gov.in/ या संकेत स्थळाला भेट दया.

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *