पर्यावरणाचे “आता वाजले की बारा”

पर्यावरणाचे  “आता वाजले की बारा”

पर्यावरणाचे “आता वाजले की बारा”

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

दर वर्षी ५ जूनला आपण ‘पर्यावरण दिन’साजरा करतो. बाकी धार्मिक सणापेक्षा-दिनापेक्षा हा दिवस खुपच वेगळा असतो. फक्त झाडाचे, फुलांचे,व प्राण्यांचे फोटो पाठवायचे. झाले आपले पर्यावरण दिन.दिवसभर व्हाट्सएप, फेसबुक व इंस्टाग्राम वर एडिट केलेले सुंदर सुंदर फोटो पाठवले की झाले. तुंबलेले गटार, गटार बनलेली नदी,त्याच त्याच खड्ड्यात लावलेले निर्जीव झाड हे आपले भंगार पर्यावरण. बिचारे सरकार तरी काय करणार? तेच अस्थिर आहेत मग पर्यावरणाचे काय घेऊन बसलात.आपण सगळे निसर्गाच्या बाबतीत कृतघ्न आहोत. अन्न,वस्त्र व निवारा या मूलभूत गोष्टी निसर्गातून अगदी सहजपणे मिळवायचे. ते विकून चिक्कर माल गोळा करायचा. आपण श्रीमंत होतो या पर्यावरण/ निसर्गाच्या कृपेने. मग आपण दानव बनून निसर्गावर अवकृपा का करावे?

पागल दौड:

गल्ली ते दिल्ली व त्याच्या आसपाच्या नद्या बघा. याच नदीत आपले पूर्वज ओंजळीने पाणी प्यायचे,मनोसोक्त पोहायचे. आज तिची अवस्था बघा. किती केविलवाणी झाली आहे . मोठं मोठे डोंगर विकासाच्या नावाखाली गायब होत आहेत. सुपीक जमिनीवर शहरे वसत आहेत. शाश्वत विकासाचे बारा वाजले आहेत. रासायनिक शेतीने परिसंस्था पार डबघाईला आली आहे. मातीत व अन्नात विष भरले आहे. खोट्या विकासाच्या नावाखाली हे ‘पागल दौड’कधी थांबणार? निसर्ग आपला गुरु/बॉस/ मालक/माता पिता आहे. हे कोणी विसरू नये.

भारतातील ३११ महत्वाच्या नद्यांपैकी महाराष्ट्रातील ५५ नद्या मरणासन्न अवस्थेत आहे. यातील परिसंस्था नामशेष होत. या नद्यांचे पाणी पिण्यालायक राहिलले नाही. २०२३ मध्ये भारतातील ‘बाटलीबंद पाणी विक्रीचा उद्योग’– ४५० अब्जावर पोहचला आहे. दरवर्षी त्यात २० % नी वाढ होत आहे. आपण सगळ्याच साधक-बाधक गोष्टीवर व्यक्त होतो आणि पर्यावरणाच्या बाबतीतमात्र गप्पा राहतो. महाराष्ट्रातील दूषित नद्यांच्या परिसंस्थेचे प्रश्न, या पाण्याच्या वापराने होणारे अनेक विकार, प्लास्टिक बंदीचे सोंग, सरकारची उदासीनता व पर्यावरण संवर्धनसाठी लोकचळवळीची गरज अश्या मुद्यावर कोठे काही घडताना दिसत नाही.

जंगलतोड:

आपण भौतिक विकासाच्या हव्यासापोटी पर्यावरणावर अन्याय करत आहोत. बेसुमार वृक्ष तोड होत आहे. या विषयी कायदा आहे. हे फक्त पुण्यातील पर्यावरण प्रेमीं आंदोलनामुळे कळते. कागदावरील कायदे वृक्षतोड कसे रोखणार? सामाजिक वनीकरण विभाग, शाळा व पर्यावरणीय संस्था या पलीकडे कोणी वृक्ष लागवड मोहीम राबवताना दिसत नाही. उन्हाळ्यात शेतीचे बांध पेटवणे व रस्त्यांच्या दुतर्फा आग लावणे हे नित्याचेच आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या वाढणारे रोपटे आपोआप नष्ट होतात.आपण पर्यावरण दिन फक्त सोशल मीडियावर साजरा करतो. साधारणपणे एक पन्नास वर्षाचे झाड पन्नास लाखापेक्षा जास्त रुपयाची अनमोल संपदा तयार करते. हे जर अवास्तव व अतार्किक वाटत असेल तर, आठवा तो कोरोनाचा काळ. झाडाने निशुल्क तयार केलेले ते ऑक्सिजन आपण हजारो रुपये देऊन खरेदी करत होतो. आपण पृथ्वी,आप,तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे आभार कधी मानणार?

स्वच्छ नद्या:

 

सर्वाधिक लोकसंख्या असणारा आपला भारत जागतिक पटलावर पर्यावरणाच्या बाबतीत मात्र खूप मागे आहे. नमामि गंगे (प्रेत वाहणारी नदी),यमुना शुद्धीकर असे अनेक ‘नदी शुद्धीकरण प्रकल्प’ बोगस निघाले आहेत .या उलट इंग्लंड,अमेरिका,रशिया,ऑस्ट्रेलिया व चीन सारखे देश पर्यावरणाच्या बाबतीत प्रगत आहेत. हे देश नद्यांना नैसर्गिकदृष्ट्या स्वच्छ व सुंदर ठेवतात. येथे नद्यांच्या बाबतीत कडक कायद्याची अमलबजावणी होते. ब्लू नदी- ग्रीनलंड, रिओ दा पोर्टा व रिओ सुरूरी – ब्राझील,अश्या अनेक नद्या स्वच्छ व नितांत सुंदर ही ठेवल्या जातात. जगातील अनेक देशांनी भौतिक प्रगती बरोबर पर्यावरणीय उन्नती साधली आहे. आपण वेळेत जागे झालो नाही तर, चित्या प्रमाणे नद्या ही नामशेष होतील. यात काही शंका नाही.

कांही मोजके योद्धे सोडले तर पर्यावरणासाठी काम करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. चिपको आंदोलन- वनमित्र सुंदरलाल बहुगुणा, पाणी फाउंडेशन- अमीर खान, पक्षी मित्र – डॉ. सलीम अली. जल पुरुष – राजेंद्र सिंग, फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया-जाधव पायेंग व नर्मदा बचाओ- मेघा पाटकर अशी माणसे सतत निर्सग संवर्धनासाठी झटताना दिसतात.

आशा आहे लेख वाचून “झाडे लावा, नदी-ओढे स्वच्छ करा”या सारख्या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होताल व इतरांनाही त्यासाठी प्रेरित करतात.

वास्तववादी प्रश्नांची समज वाढवण्यासाठी Govjob24.com साईटला अवश्य भेट द्या.

संदर्भ: स्वच्छ नदी-
          पर्यावरण मित्र-

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *