तलाठी: परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम.

तलाठी: परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम.

तलाठी: परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम.

नमस्कार मित्रांनो govjob24.com या साईटवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे.

आज आपण तलाठी पदाची परीक्षापद्धती व अभ्यासक्रम या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.आतापर्यंत अनेक उमेदवारांनी तलाठी पदासाठी अर्ज दाखल केले असतील . तरी ही कोणास माहिती नसेल तर, थोडक्यात खालील माहिती वाचुन घ्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७/०७/२०२३ आहे. एकूण पदे ४६४४ आहेत. वयाची मर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे. आरक्षणानुसार वयाच्या अटीत शिथिलता असेल. वेतन २५,५०० ते ८१,१०० रु. प्रति माह असेल.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहे. अर्जाची फीस १००० ते ९०० रु.आहे.जाहिरात येथे पहा.  ऑनलाईन अर्ज येथे करा. अधिकृत संकेतस्थळ- https://mahabhumi.gov.in/mahabhumilink  या वेबसाईटला भेट द्यावे.

तलाठी: परीक्षा पद्धती.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी ( गट-क ) संवर्गातील पदांसाठी जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख ( महाराष्ट्र राज्य ), पुणे कार्यालयाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

➽ लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील.
➽ प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.
➽ परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान आहे, परंतु ‘ मराठी ‘ विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा १२वी प्रमाणे समान असेल.
➽ उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षेत मिळालेल्या अंतिम गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार असेल.
➽ सदरील पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत.
➽ परीक्षेत निगेटिव्ह गुणदान पद्धती अवलंबली जाणार नाही.
➽ सर्व जिल्ह्यासाठी एकच प्रश्नपत्रिका असेल.
➽ परीक्षार्थी एकाच जिल्ह्यासाठी अर्ज दाखल करू शकतात.

➤    मराठी     इंग्रजी     सामान्य ज्ञान      बुद्धिमत्ता व अंकगणित
प्रश्न-   २५           २५              २५                         २५
गुण –  ५०           ५०              ५०                         ५०

एकूण प्रश्न : १००                        एकूण गुण :२००

 

 

तलाठी : परीक्षेचे अभ्यासक्रम.
मराठी:
समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व त्याचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम,क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचाराचे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समास, अलंकार इत्यादी.
उपयुक्त पुस्तके: १) सुगम मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे. २) परिपूर्ण मराठी व्याकरण- बाळासाहेब शिंदे.

English:
Synonyms, Antonyms, Proverbs, Tense, Kind of Tenses, Question Tag, Use proper From of Verb, Spot the error, Verbal Comperhension, Passage, Spelling, Sentence, Structure, one word Substitution, Phrases, Fill in the blanks.
उपयुक्त पुस्तके: १) Objective General English- S.P. Bakshi. २) English Grammar- Pal and Suri.

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी:
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायतराज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भारताच्या संदर्भात महाराष्ट्राचा भूगोल, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, समाजसुधारक, महत्वाच्या पंचवार्षीक योजना, महाराष्ट्र व भारतासंबंधी सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन, पुरस्कार, निवड-नियुक्त्यासंबंधी चालू घडामोडी.
उपयुक्त पुस्तके: १) General knowledge-Lucent Publication. २) संपूर्ण तलाठी मार्गदर्शक- K’Sagar.

बुद्धिमत्ता/ अंकगणित:
अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम- वेग, सरासरी शतमान, शेकडेवारी, चलन, दिशा – निर्देशांक, घड्याळ, क्षेत्रफळ, घनफळ, वर्ग- वर्गमूळ.
उपयुक्त पुस्तके: १) बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी. २) संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षा- पंढरीनाथ राणे.

 

admin

One thought on “तलाठी: परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *